BOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवू़ड स्टार आमिर खान आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईत झाला होता. आमिरनं त्याच्या 21 व्या वाढदिवसाला रीना दत्ता हिच्या सोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. ती त्याच्या शेजारी रहात होती.
आमिर आणि रीनाच्या घराच्या खिडक्या समोरा समोर होत्या. दोघं नेहमीच एकमेकांना पहात असायचे. असं सांगितलं जात आहे की, आमिर खान रीनाच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिला प्रपोज केलं. परंतु रीनानं मात्र त्याला नेहमीच नकार दिला आहे. आमिरचं तिच्यावर एवढं प्रेम होतं की, त्यानं रीनाला आपल्या रक्तानं पत्र लिहिलं होतं. रीनानं तेव्हाही ऐकलं नाही. उलट आमिरला असं न करण्यासाठी सांगितलं.
जेव्हा आमिरनं तिचा पिछा करणं बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र रीना त्याच्या प्रेमात पडली. असं सांगितलं जात आहे की, आमिरच्या 21 व्या वाढदिवशी दोघंही रजिस्ट्रारऑफिसला घरातून पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. इरा आणि मुलाचं नाव हे जुनैद.
लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 साली दोघं वेगळे झाले. खरं तर याचे कारण मात्र समोर आले नाही. दोघांनी घटस्फोट घेतला आणि कधीच एकमेकांविषयी काही बोलले नाही. दोघांमधील संबंध चांगले आहेत. वेगळं झाल्यानंतर आमिर म्हणाला होता की, “रीना खूप खास आहे आणि त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे आणि नेहमीच राहिल.”
आमिर म्हणाला होता की, लीगली आम्ही वेगळं झालो असलो तरी आमच्यातील बाँड कोणताही कागदाचा तुकडा संपवू शकत नाही. 2005 साली आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आझाद आहे.