BOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि काजोल हे बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे आणि दोघांमध्ये आजही खूप प्रेम दिसत आहे. दोघांनीही एकमेकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी स्विकार आहेत. अशात अजयनं काजोलची कोणती गोष्ट त्याला आवडत नाही याचा खुलासा केला आहे.
अजय देवगन सांगतो की, काजोलचं प्रमाणापेक्षा जास्त बोलणं त्याला खूप इरिटेट करतं. परंतु जेव्हा काजोल जास्त बोलत नाही तेव्हा अजय ते मिस करतो असंही त्यानी म्हटलं आहे. अजय म्हणतो, “ती सेटवर खूप बोलत असते. जर तुम्ही तिला कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं तर त्यावेळी ती काहीतरी वेगळंच करत असेल. मी तिच्या जास्त बोलण्याला घेऊन तक्रार करत असतो. परंतु जेव्हा ती गप्प असते तेव्हा मी तिला विचारत असतो, काय झालं. त्यामुळे मला हे काहीच बदलायचं नाही.”
अजय पुढे म्हणतो, “ती चांगली कलाकार आहे हे सर्वांना माहिती आहे. अॅक्टर म्हणून तिच्या सोबत काम करताना मला नेहमीच मजा आली आहे. ती माझी पत्नी आहे आणि ती मला जास्त कंफर्टेबल होऊ देते.”
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अजय देवगन लवकरच तानाजी या आगामी सिनेमात दिसणार आहे. अजय तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात काजोलही त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. काजोलनं सिनेमातही अजयच्या म्हणजेच तानाजींच्या पत्नीचा रोल साकारला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत.
Visit : boldnews24.com