BOLD NEWS 24 ONLINE TEAM : आपल्या बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्यांसाठी फेमस असणारी अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या बिंधास्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या पंगा सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडला. यावेळी तिनं बॉलिवूड इंडस्ट्रीसोबत पुन्हा एकदा पंगा घेत पोलखोल केली आहे. करण जोहर, हृतिक रोशन, आलिया भट, सोनम कपूर, रणबीर कपूर, तापसी पन्नू अशा अनेक कलाकारांना तिनं बिधास्तपणे प्रत्युत्तर दिलं आहे आणि ती अनेकदा चर्चेत आली आहे.
ट्रेलर लाँचिंग दरम्यान बोलताना कंगना म्हणाली, “मला सर्वाधिक मजा इंडस्ट्रीतील लोकांसोबत पंगा घेण्यात आली. मी ज्यांच्याशी पंगा घेतला ते सगळे किती चार्मिंग आहेत ते तुम्हालाही माहिती आहे. या इंडस्ट्रीतले लोक इतके चांगले आहेत की, ते समोरून नाही तर मागून वार करतात. समोरून ते प्रेमानं मिठी मारतात आणि मागून तुमच्या विरोधात प्लॉटींग प्लॅनिंग करतात.
पुढे बोलताना कंगना म्हणते, “इंडस्ट्रीतली हालत अशी आहे की, कधी तुमच्यावर वार होईल कळणारही नाही. यासाठी तुम्हाला नेहमीच तयार राहायला हवं. माझा आतापर्यंतचा सर्वात मजेशीर पंगा तर इंडस्ट्रीतल्या लोकांसोबत झाला आहे. मला पंगा घेतल्याचा कोणताही पस्तावा नाही. पंग्यामुळे माझ्या लाईफमध्ये बरीच ग्रोथ झाली आहे.
कंगना म्हणाली, “पंग्याची सुरुवात मी माझ्या वडिलांपासून केली होती. पप्पांसोबत पंगा घेऊन वयाच्या 15 व्या वर्षीच इंडस्ट्रीत आपलं करिअर बनवण्यासाठी निघून आले होते. जर तेव्हा मी त्यांच्याशी पंगा घेतला नसता तर या स्टेजपर्यंत कधीच पोहोचले नसते. माझ्यासाठी सगळेच पंगे चांगले ठरले आहेत. यामुळे मी लाईफमध्ये काही ना काही शिकले आहे आणि माझी ग्रोथ झाली आहे.”
Visit : boldnews24.com