BoldNews 24 Online Team – गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यापासून लांब असणाऱ्या नीतू चंद्राला आपण नक्कीच विसरला नसताल. नीतू चंद्रा खूपच बोल्ड अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. २००५ साली आलेल्या अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या गरम मसाला या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमा व्यतिरीक्त तिचे नावही अनेक वादांमध्ये समोर आले आहे.
नीतूचे प्राथमिक शिक्षण पटन्यात झाले आहे. यानंतर तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमधून ग्रॅज्यएशन पूर्ण केले. तिने १९९७ सालच्या वर्ल्ड तायकोंदो चॅम्पियनशिपमध्ये भारताचे नाव रोशन केले आहे. तिला तायकोंदोमध्ये ब्लॅक बेल्टने सन्मानित करण्यात आले आहे. तिने कॉलेज करतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
लेस्बियन फोटोशुटने घातला धुमाकूळ
नीतूने मॉडेल कृषिका गुप्तासोबत फोटोशुट केलं होतं. तिने केलेलं हे फोटोशुट खूपच वादग्रस्त ठरलं होतं आणि यामुळे खूपच राडाही झाला होता. लोकांनी या फोटोशुटला विरोध केला होता.२०१० मध्ये क्रिकेट मॅच फिक्सिंगमध्येही तिचे नाव आले आहे. असा दावा केला जात होता की, नीतू ने वादग्रस्त खेळाडू मोहम्मद आसिफसोबत संदेशाचे आदान प्रदान केले होते.
रणदीप हुड्डासोबत जोडले होते नाव
नीतू तिच्या लव लाईफ मुळेही खूप चर्चेत राहिली आहे. रिपोर्ट्सनुसार, नीतूनचे रणदीप हुड्डासोबत अफेअर होते. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे. परंतु त्यांचे रिलेशन जास्त दिवस टिकले नाही. बॉलिवूड व्यतिरीक्त नीतू साऊथ सिनेमातही झळकली आहे. तिने तेलुगू, कन्नड आणि तामिळ भाषेतील सिनेमातही काम केलं आहे.