बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –कोरोनानंतर आता जेव्हा शुटींग पुन्हा सुरू होतील तेव्हा वेब सीरिज आणि टीव्ही सीरियल्सच्या जगात काय बदल होतील याबद्दल सध्या जोरदार चर्चा होत आहे. किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन आता कसे शुट केले जातील, या सीन्सवर काही बंधनं येतील यावर चर्चा सुरू आहे. मेकर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चर्चा या सगळ्याबद्दल चर्चा सुरू आहे.
नाही होणार किसिंग सीन्स ?
इतर देशांबद्दल बोलायचं झालं तर तैवाननं अनेक वेब आणि टीव्ही शोजमध्ये किसिंग सीनवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीनंही काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ब्रिटननंही टीव्ही शोमध्ये किसिंग सीन्स स्क्रिप्टमधून काढून टाकले आहेत. शुटींग सुरू आहे परंतु अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.
प्रत्येक बेब सीरिजममध्ये आपल्याला बोल्ड कंटेट दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की, लॉकडाऊननंतर हे सीन्स कशा प्रकारे शुट केले जातील. यात अॅक्टर अॅक्ट्रेस मास्क लावतील का.
काय आहे तज्ञांचं मत ?
ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू डिजिटलचे सीईओ विभु अग्रवाल म्हणतात, “बोल्ड सीन्समध्ये कलाकारांची फिजिकल प्रॉक्सिमिटी खूपच कमी असते. लॉकडाऊननंतर बोल्ड सीनचं नाही तर नॉर्मल शुट करणंही कठिण होणार आहे.”
विभु पुढे म्हणतात, “लॉकडाऊननंतर सारं काही अवघड होणार आहे. आमची टीम आताच प्लॅन करत आहे की, शुट कसं करावं. कमीत कमी क्रू मेंबर्समध्ये शुट होईल यावर भर आहे. शुटच्याआधी आणि नंतर क्रूचं डेली चेकअप, शुटच्या आधी आणि नंतर लोकेशन सॅनिटाईज करणं अशी पावलं टाकावी लागतील. इंटिमेट सीन्सला जास्त काळजी घ्यावी लागेल. कलाकार कंफर्टेबल असतील तरच असे सीन्स शुट केले जातील.