बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. जगातील एकूण बाधितांचा आकडा 30 लाखांच्या पुढे गेला आहे तर मृतांची संख्या 2 लाख 11 हजारांहून अधिक आहे. यावर अद्याप औषध आलेलं नाही. अनेक कोरोना वॉरियर्स जीव धोक्यात घालून पुढे येत आहेत. अनेक डॉक्टरांना याचं संक्रमण झालं आहे. सरकारकडून अनेकांना पीपीई किट्स न मिळाल्यानं त्यांनी निषेधाला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानात अनेक असे डॉक्टर्स आहेत ज्यांना योग्य प्रोटेक्टीव सूट न मिळाल्यानं त्यांनी नोकरी सोडली आहे. परंतु याउलट जर्मनीच्या डॉक्टरांनी मात्र यावर वेगळा मार्ग निवडला आहे.
जर्मन फ्रंटलायनर्सनं आता त्यांचा नेकेड सेल्फी सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यांचं म्हणणं आहे जर त्यांना पीपीई किट्स मिळाले नाही तर त्यांना असंच काही फील होतं. प्रोटेक्टीव सूट आणि इतर साधनांच्या कमतरतेमुळे त्यांनी निषेध करत आता न्यूड फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
जर्मनीतील डॉक्टरांनी त्यांचा नेकेड सेल्फी सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यांचं म्हणणं आहे जर त्यांना पीपीई किट्स मिळाले नाही तर त्यांना असंच काही फील होतं. प्रोटेक्टीव सूट आणि इतर साधनांच्या कमतरतेमुळे त्यांनी निषेध करत न्यूड फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. pic.twitter.com/lMZaaWnm4G
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 11, 2020
या ग्रुपच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जानेवारीत पहिलं प्रकरण समोर आलं होतं तेव्हापासूनच किट्सची डिमांड केली जात आहे. अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही. मेडिकल टीमनं फिल्टर मास्क, गॉगल्स, ग्लव्स यांची डिमांड केली आहे जे खूप कमी प्रमाणात सल्पाय करण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं हा निषेध केला आहे त्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळताना दिसत आहे. जर्मनीत सध्या बाधितांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. जर्मनीत लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे.
मास्क आणि पीपीई किट्सच्या कमतरतेमुळं डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इथं बसमध्ये मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे.