BOLD NEWS 24 ONLINE TEAM – बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी न्यु इयर सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाही. सध्या हे सेलेब्रिटी व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसु हेही व्हॅकेशनसाठी गेले आहे. नुकतेच दोघांचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. बिपाशा आणि करणनं व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
करण आणि बिपाशा दोघंही बीचवर एनजॉय करताना दिसत आहेत. बिपाशा यावेळी खूपच हॉट दिसून आली. बिपाशानं बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. सध्या करण आणि बिपाशाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना बिपाशा म्हणते, “Picture perfect… We are in Heaven.” करण आणि बिपाशाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. फोटोंमध्ये दोघांची बाँडिंग पाहण्यासारखी आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिपाशा दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. 2015 साली आलेल्या अलोन सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2016 साली अॅक्टर करणसिंग ग्रोवर सोबत लग्न केल्यानंतर बिपाशा बॉलिवूडमधील एकाही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.
लवकरच बिपाशा बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे. 2009 साली बिपाशाने बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केलं होतं. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा आहे. या सिनेमातील तिच्या अॅक्टींगची खूप स्तुती झाली होती. करणबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो कसोटी जिंदगी की या मालिकेत दिसला होता.