BOLD NEWS 24 ONLINE TEAM : एखाद्या पुरुषाला एखादी महिला आवडत असेल तर पुरुष थेट तिच्याकडे पाहतात आणि सर्वत्र ही गोष्ट कळून येते. परंतु एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडत असेल तर ती थेट त्याच्याकडे पहात नाही. ती हुशार असते. ती कोणालाही या गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाही, अगदी ज्याच्यामध्ये तिला रस आहे त्यालाही हे कळत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता की ती महिला तुमच्यावर लट्टू आहे.
1) गोष्टी लक्षात ठेवणे- एखादी व्यक्ती जर तुमच्या लहान सहान गोष्टीही आवर्जून लक्षात ठेवत असेल तर समजून जा की तुम्ही तिच्यासाठी स्पेशल आहात. तुम्हाला जर असं स्पेशल अटेंशन मिळत असेल तर समजून जा ती तुमच्यावर लट्टू आहे.
2) स्माईल- जर ती मुलगी तुमच्याकडे पाहून किंचीत स्माईल करत असेल किंवा बोलताना नेहमीच हसतच बोलत असेल तर समजून जा की ती तुम्हाला सकारात्मक संदेश देत आहे. तुम्ही चेहऱ्याच्या हावभावावरून अशा स्माईलचा अंदाज लावू शकता.
3) चोरून पाहणे- काही मुली आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत असतानाही जर चोरून तुमच्याकडे पहात असतील तर समजून जा की ती तुम्हाला लाईक करत आहे. हळूच ती तुम्हाला पाहून स्माईल करत असेल तर हा एक इशारा आहे.
4) एकटक पाहणं- जेव्हा एखादी महिला तुमच्याकडे पाहते आणि तुम्ही तिला पाहिलं तर ती लगेच दुसरीकडे पाहते. यातून असे समजू नका की ती नजर फिरवत आहे. उलट यातून ती तुमच्यामध्ये रस घेते आहे हेच ती सांगत असते. थेट आय कॉन्टॅक्ट करणे त्या बऱ्याचदा टाळतात.
Visit : boldnews24.com