BOLD NEWS 24 ONLINE TEAM : लग्नानंतर महिलांचा सेक्समधील उत्साह कमी होऊ लागतो. बहुत करून भारतीय महिलांच्या बाबतीत हेच पाहायला मिळतं. अखेर याचे काय कारण आहे. सेक्शुअल संबंध बनवताना महिलांना पतीकडून काय हवं असतं. एका सर्व्हेतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. महिलांनी अनेक इच्छा स्षष्ट सांगितल्या आहेत. सर्व्हेमध्ये समोर आलं आहे की, अनेक भारतीय महिलांचा सेक्समधील रस कमी झाला होता तर काहींचा रस संपला होता.
कामामुळे थकणे, सासू-सासऱ्यांची सेवा तसेच मुलांच्यामागे धावणे यातच भारतीय स्त्रियांचा दिवस सरतो. यानंतर त्यांना काही हवं असेल तर म्हणजे पतीचं प्रेम, तो कोमल स्पर्श ज्यामुळे त्यांचा दिवसभराचा थकवा जाईल. पतीकडून काही भावनात्मक समर्थन मिळाले नाही तर पत्नींची सेक्समधील रुची कमी होऊ लागते. यानंतर त्या सेक्सला एक काम समजून ते निपटवतात. यात मोठी संख्या ही काम करणाऱ्या महिलांची आहे. अशा महिला कामावरून घरी आल्यानंतर पतीकडून प्रेम, आदर आणि सहयोगाची अपेक्षा करतात. परंतु असे झाले नाही तर त्यांना अशी जाणीव होते की, पती केवळ आपल्या मतलबासाठीच जवळ येत आहे. अनेक महिलांची अशी तक्रार होती की, त्यांचे पती केवळ सेक्सलाच प्रेम समजतात. पत्नींच्या गरजेप्रति त्यांचं जास्त लक्ष नसतं. त्यामुळे महिलांची सेक्सप्रति इच्छा कमी होते.
आज्ञाधारक भारतीय पत्नी आपल्या पतीसोबत सेक्सबाबत खुलून बोलणे टाळतात. त्यांना वाटतं की, त्यांचा पती त्यांना चुकीचे समजेल. त्यामुळे अशा महिला सेक्स फँटसी पतीसोबत शेअर करणं टाळतात. अनेक महिलांनी सर्व्हेदरम्यान असं सांगितलं की, सेक्स दरम्यान पती केवळ त्यांच्याच समाधानाची काळजी घेतात. सेक्सनंतर त्यांच्या पत्नीला काय वाटत यामुळे त्यांना कही फरक पडत नाही. आपल्या इच्छांकडे पतीने दुर्लक्ष केल्यानेही त्यांचा सेक्समधील रस कमी होतो.या सर्व्हेत आणखी गोष्ट समोर आली की, भारतीय आपल्या पार्टनर पार्टनरच्या व्हर्जिनिटीला खूपच गांभीर्याने घेतात. त्यांचं असं मत आहे की, नात्यात येण्याआधी पार्टनरची व्हर्जिनिटी खूप महत्त्वाची आहे. तब्बल 53 टक्के लोक आपल्या पार्टनरच्या व्हर्जिनिटीला घेऊन गंभीर असतात. हा सर्व्हे 23 जानेवारी 2019 ते 20 फेब्रुवारी 2019 दरम्यान 4028 लोकांच्या संभाषणावर आधारीत आहे. यात 14-29, 30-49, 50-69 अशा तीन वयोगटातील लोकांचा समावेश होता.
Visit : boldnews24.com