BOLD NEWS 24 ONLINE TEAM : रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा 11 सीझन लवकरच सुरु होणार आहे. सध्या यातील एका एपिसोडदरम्यान घडलेला एक किस्सा समोर आला आहे. यातील ऑडिशनला आलेल्या एका स्पर्धकाने नेहा कक्करला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, एकामागे एक स्पर्धक येत आहेत आणि ऑडिशन देत आहेत. यातील एक स्पर्धक नेहासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येतो. तो सर्व गिफ्ट नेहाला देतो. नेहा खुश होऊन त्याला मिठी मारते. यावेळी तो नेहाला गालावर किस करतो. नेहा चकित होते आणि लगेचच बाजूला सरकते. बाकी परिक्षकही हे पाहून हैराण होतात.
यातील एका स्पर्धकाचं गाणं ऐकून तर नेहाला रडूही कोसळतं. जज विशाल दललानीही म्हणतो की, तुझ्या गाण्यामुळे मला माझ्या गाण्याचा अर्थ कळला. इंडियन आयडॉलचा 11 वा सीजन नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक जज करत आहेत.
Visit : boldnews24.com