बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस सध्या सलमान खानच्या फार्महाऊसवर क्वारंटाईनमध्ये आहे. पनवेलवरील या फार्महाऊसवर असताना तिनं तिचा नेटफ्लिक्सवरील सिनेमा मिसेस सिरियल किलरचा प्रचारही करत आहे. अशात जॅकलीननं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.
जॅकलीनच्या तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं सांगितलं आहे की, ती क्वारंटाईनमध्ये कशा प्रकारे दिवस काढत आहे. हा व्हिडीओ तिनं सलमानच्या फार्म हाऊसवर शुट केला आहे. तिनं फोनच्या साहाय्यान पूर्ण शुटींग केली आहे. व्हिडीओत ती अनेक अतरंगी गोष्टी करताना दिसत आहे. कधी ती घोडेस्वारी करत आहे तर कधी ती नारळाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. कधी ती कपडे सुकवत आहे तर कधी जनावरांना खायला घालत आहे. दिवसभरातील अनेक हालचाली ती करत आहे.
व्हिडीओ शेअर करताना जॅकलीननं खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, माझी छोटीसी फिल्म. एन्जॉय.”
जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरीजमध्ये दिसली आहे.