BOLD NEWS24 ONLINE TEAM : स्टाईल कोणतीही असो बॉलिवूड स्टार करीना कपूर आपली स्टाईल खूपच ग्रेस आणि एलिंगेट पद्धतीनं कॅरी करत असते. करीनाचे असेच काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत ज्यांची सोशलवर चर्चा सुरू आहे.
https://www.instagram.com/p/B4_542BHQmb/
नुकताच करीनाच्या गुड न्यूज सिनेमाचा ट्रेलर लाँचिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेता अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी हेदेखील आले होते. परंतु करीनाच्या लुक आणि सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
https://www.instagram.com/p/B4_3v9MHOWt/
करीनानं लाईट येलो रंगाचा ड्रेस घातला होता. मोकळ्या केसांमध्ये करीना खूपच सुंदर दिसत होती. लाँचिंग इव्हेंटमध्ये करिना मोहक अंदाजात दिसून आली. यावेळी टीम सोबत करीना वेगळ्याच अंदाजात दिसून आली.
एका फोटोत तर करीना अक्षयच्या मांडीवर बसून पोज देताना दिसून आली. करीनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही करीनाचे फोटो खूप आवडले आहेत.
सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर गुड न्यूज या सिनेमात अक्षय आणि करीना दिल्लीचं कपल म्हणून दिसत आहे. ज्यांना मूल हवं आहे. या दोघांव्यतिरीक्त सिनेमात दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीही दिसत आहे.
दिलजीत आणि कियारा पंजाबी कपल म्हणून दिसणार आहेत. दिलजीत आणि कियारा सिनेमात अक्षय-करीनाला आयव्हीएफ द्वारे मूल जन्माला घालण्यास मदत करणार आहेत.
Visit : boldnews24.com