BOLD NEWS 24 ONLINE TEAM : अनेक महिला प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. अशा गोळ्या घेणं त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं. परंतु जर महिलांना प्रेग्नंट व्हायचं नसेल तर आणि हानिकारक गोळ्याही घ्यायच्या नसतील तर त्यांच्यासाठी आता मार्केटमध्ये नवीन उपाय आला आहे. ज्या प्रमाणे पुरुष कंडोमचा वापर करतात त्याप्रमाणेच आता महिला कंडोम वापरू शकतात. हा एक फीमेल कंडोम आहे जो महिलांसाठी तयार करण्यात आला आहे.
महिला कंडोम आता भारतातही उपलब्ध आहे. शारीरिक संबंध ठेवताना याचा वापर केल्यास पूर्णपणे सुरक्षा मिळते. वेलविट नावाच्या ब्रँडचा हा फीमेल कंडोम मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एचएलएल कंपनी सांगते की, “गर्भनिरोधक गोळ्यांनंतर आता नको असलेली प्रेग्नंसी टाळण्यासाठी हा दुसरा उपाय आहे.”
फीमेल कंडोमचे फायदे-
1) गर्भनिरोधक गोळ्यांसाठी दुसरा चांगला पर्याय.
2) कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
3) अनेक आजारांपासून बचाव.
4) शरीरासाठी हानिकारक नाही.
5) नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी फायदेशीर.
कंडोमच्या मर्यादा/तोटे
या फीमेल कंडोमच्या मर्यांदांबद्दल बोलायचं झालं तर हा कंडोम मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याचे कारण म्हणजे याची कॉस्ट खूप जास्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, जर हा कंडोम योग्य पद्धतीनं लावला गेला नाही तर तो फुटण्याची शक्यता असते. काही कपल्सचं असं म्हणणं आहे की, कंडोमचा वापर केल्यानं शारीरिक संबंधांची मजा खराब होते.
Do You Know About ‘Female Condoms’? Learn Some Interesting Things!