बोल्डन्युज२४- बॉलिवूड स्टार अजय देवगणचा मैदान हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चाहत्यांना या स्पोर्ट ड्रामा सिनेमाची आतुरता आहे. अशात आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. खुद्द अजयनं सोशलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चाहत्यांना या सिनेमासाठी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. कारण हा सिनेमा 13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. रिलीज डेट सांगतानाच याचं पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे.
अजयनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये अजयचा शानदार अंदाज दिसत आहे. चाहत्यानाही हा लुक खूप आवडला आहे. कॅप्शनमध्ये अजय म्हणतो, “2021 स्वतंत्र दिनाचा आठवडा. एक अशी न ऐकलेली कहाणी, जिचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. 13 ऑगस्ट मार्क करून ठेवा.”
अजयचा मैदान हा सिनेमा आधी याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं इतर सिनेमांप्रमाणेच सिनेमाची शुटींग आणि रिलीज डेटवर ब्रेक लागला होता.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे.