BOLD NEWS 24 ONLINE TEAM : अभिनेत्री रवीना टंडन काही दिवसांपूर्वीच आजी झाली होती. तिची दत्तक मुलगी छाया हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतलं होतं. 90 च्या दशकातील काळ गाजवणारी रवीना टंडन आपल्या नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.
रवीनाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. नच बलिए 9 च्या ग्रँड फिनालेमधील तिचा हा लुक आहे. नव्या फोटोंमध्ये रवीना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. वयाच्या 45 वर्षीही रवीना कमालीची सुंदर दिसत आहे.
रवीनाने 1995 मध्ये पूजा आणि छाया अशा दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी पूजा 11 आणि छाया 8 वर्षांची होती. त्यावेळी रवीना सिंगल होती. रवीनाने 22 फेब्रुवारी 2004 रोजी फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केलं. बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवीनाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत.
रवीनाने मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. यातील मोहरा सिनेमा खूप गाजला. यामधील तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणं तर खूप हिट झालं.
Visit : boldnews24.com