BOLD NEWS 24 ONLINE TEAM : तुमच्या खाण्या-पिण्याचा आणि लाईफस्टाईलचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवरही होत असतो. त्यामुळे सेक्स लाईफमध्ये आहार आणि जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही माऊथ फ्रेशनर्स, च्युइंगम, मिंटच्या गोळ्या, टॉफी असं काही खात असाल तर याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होऊ शकतो. कारण यात आर्टीफिशयल स्वीटनर्सचा वापर केलेला असतो ज्याचा परिणाम थेट कामेच्छेवर होतो. त्यामुळे आर्टीफिशियल स्वीटनर्सचा रोज वापर करणे टाळायला हवे.
आर्टीफिशियल स्वीटनर्समुळे नेमकं काय होतं ?
याच्या सेवनाने तुमच्या शरीरात सेराटोनिन हार्मोन्सचे प्रमाण प्रभावित होते. हे आनंद देणारे हार्मोन्स आहेत. आर्टीफिशियल स्वीटनर्स या हार्मोन्सचे प्रमाण कमी करतात. याचं प्रमाण असंतुलित झालं तर लो लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी होते. याशिवाय आर्टीफिशियल स्वीटनर्समुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि परफॉर्मंस एंक्जायटी यांसारख्या समस्याही येऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे याचं सेवन करत असाल तर वेळीच काळजी घ्या.
तोंडाच्या दुर्गंधीसाठी हे खा
जर तुम्हाला काही गोड खायचंच असेल तर तुम्ही हेल्दी स्वीटनर्सचा वापर करू शकता. जेवणानंतर जर तुम्हाला काही गोड खायचं असेल तर मध किंवा गुळाचा लहान तुकडा तुम्ही खाऊ शकता. याशिवाय जर माऊथ फ्रेशनर म्हणून तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही बडीशेप खाऊ शकता. याशिवाय पुदीन्याच्या ताज्या पानांचेही सेवन तुम्ही करू शकता.
Visit : boldnews24.com