BOLD NEWS24 ONLINE TEAM : दक्षिण भारतातील प्रसिद्ध एडल्ट अभिनेत्री शकीला खानचा आज वाढदिवस आहे. शकीला ही स्वत: एक चांगली अभिनेत्री आहे. तिला आयुष्यात जवळच्या व्यक्तीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. शकीलाच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढ-उतार आले. कधी आईने तिला पैशांसाठी वेश्या बनण्यास भाग पाडले तर कधी जगाने तिला शांततेने जगू दिले नाही.
शकीलाने वयाच्या 20 व्या वर्षी ‘प्लेगर्ल’ या सॉफ्ट पॉर्न फिल्मपासून करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात शकीलाने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. चेन्नईमध्ये जन्मलेल्या शकीलाचे बालपण अत्यंत हालाकीचे गेले. शकीलाने फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतले. शकीला अजूनही दक्षिण चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. तिने मल्याळम, तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
२००० मध्ये ‘किन्नर थुंबिकल’ हा मल्याळम चित्रपट आला होता. या चित्रपटाने शकीलाला इतकी प्रसिद्धी दिली की, तिच्या चित्रपटांना बर्याच भाषांमध्ये डब करुन प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटामुळे शकीलाला इतकी ओळख मिळाली की लोक तिचे नाव ओळखू लागले. पण एक ए़डल्ट अभिनेत्री म्हणून शकीलाने आतापर्यंत अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शकीलाने स्मिताच्या पाऊलावर पाऊल टाकत एडल्ट चित्रपट करण्यास सुरुवात केली. जेणेकरून ती तिच्या 6 भावंडे आणि आईचे पालन करु शकेल. जेव्हा तिने चित्रपटसृष्टीत बरेच नाव कमावले, तेव्हा तिने तिचे आत्मचरित्र लिहिले जे मलयाली भाषेत छापले गेले. या पुस्तकानुसार, शकीलावर अगदी लहान वयातच एका माणसाने बलात्कार केला होता. त्याने शकीलाच्या आईला सांगितले की, त्या बदल्यात मी आपल्या कुटूंबाला पैसे देईल.
शकीलाने मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिला दुसरे काहीही करता येणार नाही. मी माझ्या आईसोबत लहानपणापासून राहत आहे. आई म्हणाली की, मला अनेक मुले आहे आणि सगळ्यांचे पालन करायचे आहे. मला वाटले तु हे करेल. अशा प्रकारे ती या दलदलीमध्ये आली.
अभिनेत्री शकीलाने दोन दशकांपर्यंत दक्षिण भारतीय एडल्ट चित्रपटांवर राज्य केले आहे. तिने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. लवकरच ऋचा चड्ढा शकीलाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. शकीलाचे वैयक्तिक आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले होते जे तुम्ही या चित्रपटात पहाल.
Visit : boldnews24.com