BOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूड आणि कास्टींग काऊचमधील अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. यानंतर आता अमेरिकन सिंगर क्रिस्टीना ऐगीलेराने हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीला पुरुषप्रधान इंडस्ट्री म्हणत क्रिस्टीना म्हणाली, “जेव्हा तुमचं वय कमी असतं आणि असं असतानाही जेव्हा तुम्ही पुरुष प्रधान इंडस्ट्रीत पदार्पण करता तेव्हा तुम्हाला टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं. त्यांनी तर चक्क माझ्या स्तनांवर कमेंट केली.”
क्रिस्टीना पुढे म्हणाली, “महिला पुरुषाच्या दृष्टीकोनातून लैंगिकतेचा विचार करत नाहीत. जर तुम्ही माझ्या कामाकडे पाहिलंत तर तुम्हाला दिसेल मी किती प्रोग्रेसिव्ह होते.”
क्रिस्टीना ऐगीलेराने बद्दल सांगायचे झाले तर अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी तिनं म्युझिक अल्बम लाँच केला होता.
Visit : boldnews24.com