बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर हिचा एक भुवई उडवातानाचा व्हिडीओ समोर आला आणि ती रातोरात स्टार झाली. पहिला मल्याळम सिनेमा ओरू अडार लव सिनेमातील गाणं मानिक्य मलाराया पूवी मध्ये तिनं उडवलेल्या भुवईच्या काही सेकंदाच्या व्हिडीओनंच तिला मोठी स्टार बनवलं होतं.
साऊथ सिनेमातील प्रसिद्ध नाव प्रिया प्रकाश हिनं आता टिकटॉकवर डेब्यू केला आहे. तिनं तिचे काही टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना तर तिनं ज्या भाषेत व्हिडीओ केले आहेत त्याची अजिबात अडचण नाही. तरीही काहींनी तिला हिंदीमध्ये व्हिडीओ करण्याची विनंती केली आहे.
प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा ओरू अडार लव हा एक रोमँटीक ड्रामा होता. हा सिनेमा लुलु यांनी डायेरक्ट केला होता. यात सियाद शाजान, रोशन अब्दुल रहूफ आणि नूरिन शेरिफ यांनी काम केलं होतं. हा सिनेमा कन्नड आणि तेलगुमध्येही डब केला होता. प्रिया लवकरच श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे अशीही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.