BoldNews 24 Online Team – प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांना सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने डब्बू बॉलिवूडमधील वेगवेगळ्या स्टार्ससोबत फोटोशुट करत आहेत. डब्बू रतनानी यांनी सनी लिओनीसोबतही थायलंडमध्ये फोटोशुट केलं आहे. डब्बूने त्यांचे काही व्हिडीओही इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओत सनी लिओनी हॉट बिकीनी घालून समुद्र किनाऱ्यावर सेक्सी अंदाजात पोज देताना दिसत आहे.
सनीने दिलेली प्रत्येक पोज घायाळ करणारी आहे यात शंका नाही. सनीचा हा बिंधास्त अंदाज चाहत्यांना नेहमीच भावत असतो. सनीच प्रत्येक निराळा अंदाज पाहण्यासारखा असतो हे तुम्ही या व्हिडीओतही पाहू शकता. सनी कधी बोटवर तर कधी समु्द्र किनारी पोज देत फोटो काढताना दिसत आहे. डब्बू रतनानी यांच्या इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेले हे व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत.
सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिचा आगामी सिनेमा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. कोका कोला असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमासाठी ती उत्तर प्रदेशची स्थानिक भाषाही शिकत आहे. याशिवाय सनी दक्षिण भारतीय सिनेमा रंगीला आणि वीरामादेवी मध्ये देखील दिसणार आहे. सनीचे चाहते तिला लवकर पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. सनी सोशल वर नेहमीच सक्रिय असते. सनी नेहमीच आपल्या आयुष्यातील क्षणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनीने फोटो किंवा व्हिडीओ शेअर करायचा उशीरच असतो की, तो लगेचच व्हायरल होत असतो.