बोल्डन्युज२४- अलीकडेच अशी घटना समोर आली जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या एका चाहत्यानं कॉमेडीयन कपिल शर्माला ट्रोल केलं. युजरनं कमेंट करताना अश्लील भाषा वापरली होती. कपिलनंही त्याला त्याच्या भाषेतच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कपिलनं केलं होतं ट्विट
कपिलनं अलीकडेच कानपूर एनकाऊंटरमध्ये शहीद झालेल्या 8 पोलिसांसंदर्भात ट्विट केलं होतं. कपिलनं लिहिलं होतं की, गुन्हेगारांना पकडून ठार मारायला हवं. तेव्हा शहीदांच्या आत्म्याला शांती मिळेल.
I will not say Rest In Peace because I know they will not until we find the culprits n kill them 🙏 more power to u @Uppolice jus find them n kill them 🙏 that’s it 💔 https://t.co/WmbRiyo28I
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) July 4, 2020
कपिलच्या याच ट्विटवर अश्लील भाषावर वापरत एकानं कमेंट केली की, ज्ञानचंद सुशांत सिंह राजपूतसाठीही ट्विट करा.” कपिलनंही त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं की, “तुम्ही तुमचं तोंड तेव्हाचा उघडा जेव्हा तुमच्याकडे योग्य कारण असेल.” दोघांनी वापरलेले शब्द तुम्ही ट्विटमध्ये सविस्तर पाहू शकता.
Ab apki bhaasha me! :- gotichand.Mera pichwaada to theek hai, aap kripya apna pichwaade jaisa munh tabhi khole’n jab apke paas uchit kaaran ho 🙏 https://t.co/SzSigzitqF
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) July 4, 2020
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. करण जोहरसह अनेक स्टार किड लोकांच्या निशाण्यावर आहेत. यात आलिया भट, सोनाक्षी सिन्हा असे अनेक स्टार किड आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे. अनेकांनी आजवर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.