boldnews24 online team – अभिनेत्री तापसी पन्नूची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख आहे. याचे कारण म्हणजे तिचा पडद्यावरील शानदार अभिनय. तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये येण्याआधी साउथ इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे.
तापसीने २००० मध्ये झुमंडी नाडम (Jhummandi Naadam)चित्रपटामधून पदार्पण केले होते. ९ वर्षाच्या करिअरमध्ये तापसी पन्नूचा लुक खूपच बदलला आहे. तिच्या जुन्या फोटोमध्ये तिला ओळखणे कठिण आहे.

तापसीने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. साउथ इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता तो म्हणजे ‘चश्मेबद्दूर’ यानंतर तिने २०१४ मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ चित्रपटात काम केले.
तापसीला बॉलिवूडमध्ये २०१६ मध्ये आलेला चित्रपट ‘पिंक’ पासून ओळख मिळाली. यानंतर तापसीने लागोपाठ बॉलिवूडमध्ये आपले काम चालू ठेवले. तापसी भलेही बॉक्स ऑफिसच्या रेसमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये सामील नसली तरी तिच्या चित्रपटांचे चाहते खूप वेडे आहे.

तापसीने ८ वर्षामध्ये कथक आणि भरतनाट्यमची ट्रेनिंग घेतली होती. तापसीने इजीनिअरींगचे शिक्षण घेतले पण मॉडेलिंगनंतर तापसी पन्नूने चित्रपटात काम करण्याचे ठरविले. तापसीच्या चित्रपट करिअरकडे पाहिले तर तिने आपल्या लुकवर जास्त काम केले आहे. आता तापसी पहिल्यापेक्षा जास्त ग्लॅमरस दिसते.


