BoldNews 24 Online Team – शरत सक्सेना यांनी १९७७ साली प्रदर्शित झालेल्या एजंट विनोद या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे चाहत्यांनी खूपच कौतुक केले होते. हेच कारण आहे की, त्यांना हिंदी सिनेमांशिवाय तेलुगू, तमिळ आणि पंजाबी सिनेमातही काम करण्याची संधी मिळाली आहे. शरत सक्सेना यांची एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली आहे. त्यांना सिनेमांमधील दमदार अॅक्टींगमुळेच लोक ओळखतात. शरत यांच्या मुलीबद्दल क्वचित कोणाला माहीत असेल. शरत यांच्या मुलीचे नाव वीरा सक्सेना आहे. वीरा एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तुम्ही वीराला पडद्यावर पाहिले आहे.
वीराने बॉलिवूड सिनेमा हंटर मधून बॉलिवूड मध्ये डेब्यू केला आहे. सध्या वीराची सोशलवर चर्चा होत आहे. तिचे काही फोटो समोर येताना दिसत आहे जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. शरत सक्सेनाची लाडकी वीरा सक्सेना एक उत्तम अभिनेत्री आहे. वीरानेही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
वीरा सक्सेना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वीराचा बोल्ड अंदाज सर्वांनाच आवडतो. तिच्या कुरुळ्या केसांमुळे ती अधिकच सुंदर वाटते. तिचे कुरुळे केस तिच्या लुकचा प्लस पॉईंट आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वीराला बिंधास्त राहायला खूप आवडते. वीराचे इंस्टाग्रामवरील काही फोटो पाहिले तर तुमच्याही ते लक्षात येईल. अनेक फोटोत ती बोल्ड लुकमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे. वीराचा अभिनय देखील कौतुक करण्यासारखा आहे.