boldnews24 online team – एकेकाळी आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेली ढींचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजाचं नवीन गाणं आलं आहे. नाच के पागल असं या गाण्याचं नाव आहे. सध्या पूजाचं हे गाणं सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी वेगवेगळे मीम्सही शेअर केले आहेत. 2.03 मिनिटांच्या या गाण्याला अद्याप लाखो लोकांनी पाहिले आहे. आपल्या विचित्र गाण्यांनी ढींचॅक पूजाने अनेक रेकॉर्ड्स बनवले आणि तोडले आहेत.
https://youtu.be/1AFQGcP1VoQ
सेल्फी मैने ले ली आज, दिलों का स्कूटर आणि स्वैग वाली टोपी नंतर आता पूजा नाच के पागल या गाण्यासोबत परत आली आहे. पूजा पुन्हा एकदा आपल्या या गाण्यामुळे ट्रोल होत आहे. पूजाच्या या गाण्यामुळे आणि मजेदार मीम्समुळे ट्विटरवर #dhinchakpooja हा हॅशटॅग ट्रेडिंग आहे. लेटेस्ट गाण्याबाबत बोलायचे झाले तर युट्युबवर हे गाणं इतकं पाहिलं जात आहे की, युट्युबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हे गाणं टॉपवर यायला लागलं आहे. रिपोर्ट्सनुसार, नाच के पागल हे गाणं सध्याला 4 थ्या क्रमांकावर आहे.
image.png
ढींचॅक पूजा सोशलवर प्रचंड ट्रोल
image.png
एका युजरने पूजाला ट्रोल करत म्हटले आहे की, “तुझ्यामुळेच मी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.” आणखी एका युजरने म्हटले आहे की, हिंमत असेल तर ढींचॅक पूजाचं गाणं पूर्ण पाहून दाखव.”
image.png
पूजाबद्दल आणखी सांगायचे झाले तर पूजा बिग बॉस 11 मध्ये दिसली होती.