पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री रसिका सुनील हिला आपण सर्वजण ओळखतो. माझ्या नवऱ्यची बायकोध्ये तिनं शनायाची भूमिका साकारली आहे. रसिका नेहमीच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. तिचा मॉडर्न अंदाज चाहत्यांनाही खूप भावत असतो. नेहमीच बोल्ड दिसणारी रसिका आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही बिकिनीतले आणि मोनोकनीमधील काही फोटो सोशलवर चर्चेत आले आहेत.
रसिकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती प्रचंड हॉट दिसत आह. तसं तर रसिकाला वेस्टर्न आउटफिट खूप आवडतो. ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या तिचे काही बिकिनीतले आणि मोनोकनीतील फोटो सोशलवर धुमाकूळ घालतान दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच रसिकानं स्कुबा डायविंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिला यासाठी प्रमाणपत्रही मिळालं आहे. तिनं स्वत: इंस्टाग्रामवरून फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. यानंतर आता ती व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचं प्रशिक्षण घेणार आहे असंही ती म्हणाली होती.
रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती काम करत होती. यात तिनं शनायाची भूमिका साकारली होती. यात तिचा मॉडर्न आणि निगेटीव्ह रोल होता. या रोलनं तिला खूप लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वची रसिका मालिका सोडून अमेरिकेला गेली होती. तिथं ती शिक्षण घेत होती आणि तिच्या आवडीच्या इतरही गोष्टी करत होती.